आश्विन: हिंदू कालगणनेतील सातवा महिना. याच्या पौर्णिमेस चंद्र अश्विनी नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याचे नाव आश्विन पडले. या महिन्यात सूर्याचे तूळसंक्रमण घडते. आश्विनाला इष, अश्वयुज किंवा शारद हीही नावे आहेत. शुद्ध पक्षात घटस्थापना (प्रतिपदा), सतीची पूजा (चतुर्थी), ललितापंचमी, सरस्वतिउत्सव (पंचमी ते नवमी), विजयादशमी व कोजागिरी किंवा ज्येष्ठापत्यनीरांजन (अश्विनी) आणि कृष्णपक्षात वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन (अमावस्या) हे महत्त्वाचे दिवस असतात. या महिन्यात रामरावणयुद्ध, कृष्णाकडून नरकासुराचा वध आणि पांडवांच्या अज्ञातवासाचा शेवट या घटना घडल्या.

ठाकूर,अना.