आर्वी – १ : वर्धा जिल्ह्यातील तहसिलीचे ठिकाण. लोकसंख्या २६,४९६ (१९७१). मध्य रेल्वेच्या ३५·४ किमी. लांबीच्या पुलगाव-आर्वी फाट्यावरील स्थानक. सु. तीनचारशे वर्षापूर्वी तेलंगराय साधूने वसविल्यामुळे या गावाला तेलंगरायची आर्वी असेही म्हणतात. ही कापसाची मोठी बाजारपेठ असून गुरे, लोणी, केळी, विड्याची पाने, इमारती लाकूड यांकरिता प्रसिद्ध आहे.

जोशी, चंद्रहास