हिरण्यगर्भ : एक हिंदू देवता. तिला प्रजापती, ब्रह्मा किंवाब्रह्मदेव असेही म्हणतात. या देवतेचा उल्लेख ऋग्वेदा(१०.१२१.१-८) असून तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण, बृहदारण्यकोपनिषद इत्यादींमध्ये ऋग्वेदा तीलमताचे अनुकरण केलेले आहे. ऋग्वेदातील हिरण्यगर्भ किंवा प्रजापती पुराणकाळात ‘ब्रह्मा’ किंवा ‘ब्रह्मदेव’ या नावाने प्रसिद्ध झाला. विश्व हे नियमबद्ध आहे. हिरण्यगर्भादी सर्व देव विश्वाच्या त्या नियमांचे प्रमाद न करता पालन करतात. ऋग्वेदातील हिरण्यगर्भाच्या सूक्ताने हिरण्यमय पुरुषाची स्थापना होते.सायणाचार्यांच्या मते, हिरण्यगर्भ म्हणजे ‘हिरण्मयस्य अण्डस्य गर्भभूतः प्रजापतिः’ म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न झालेले सोनेरी अंडे होय. ही देवता सूक्तकार असून हिरण्यगर्भ हा शब्द अनेक प्रकारांनी व्युत्पादिला जातो : हिरण्यमयः गर्भः = हिरण्याने भरलेला गर्भ किंवा हिरण्यमयः विज्ञानमयः गर्भः = हिरण्यमय हा विज्ञानमय गर्भ आहे, म्हणजे तो ज्ञानस्वरूप आहे. हिरण्यगर्भ हा सृष्टीचे मूलतत्त्वअसल्याचे वैदिक ऋषींनी म्हटले आहे. ऋग्वेदा त द्यावापृथिवी, जल व जीवसृष्टी यांना जन्म देणारा आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ देव म्हणून हिरण्यगर्भाचा उल्लेख आहे. सूर्य त्याच्या कृपेने प्रकाशित होतो. सूर्याचेएक रूढ विशेषण हिरण्यगर्भ हे आहे. तो देवतांचा प्राण आहे. यज्ञाचा जन्मदाता आहे. तोच आपल्या महिम्याने सर्व देवांमध्ये एकटाच वरिष्ठठरला आहे. 

पहा : ब्रह्मदेव. 

गुडेकर, विजया म.