हिपोनॅक्स : (इ. स. पू. सु. ५४०) . ग्रीक उपरोधकार कवी. इफेससचा हिपोनॅक्स म्हणून तो ओळखला जातो. त्याला हद्दपार करण्यात आले होते आणि त्या काळात तो स्यर्नाजवळील क्लॅझोमने येथे वास्तव्य करून होता, असे म्हटले जाते. त्याने काही आयाँबिक उपरोधिका लिहिल्या असून त्याची कविता अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. असे म्हणतात, की दोन कलावंतांनी त्याचा पुतळा प्रदर्शित केला आणि त्याच्या कुरूपतेचा उपहास केला. त्यानंतर हिपोनॅक्सने आपल्या उपरोधप्रचुर कवितांनी त्यांच्यावर एवढी कडवट टीका केली, की निराशावस्थेत त्यांनी स्वतःला टांगून घेऊन आत्महत्या केली.
कुलकर्णी, अ. र.
“