टर्टीअस : (इ. स. पू. सातवे शतक). ग्रीक भावकवी. दुसऱ्या मेसेनियन युद्धात स्फूर्तिदायक समरगीते रचून त्याने स्पार्टनांची वीरवृत्ती सतत चेतवीत नेली व त्यांचे मनोधैर्य वाढविले. हा मूळचा अथेनियन असून स्पार्टाच्या विनंतीवरून अथेन्सने त्याला युद्धसाहाय्यार्थ पाठविले, असे परंपरा मानते. तो लकोनिअन किंवा मायलेशिअन असावा, असे स्यूइडॅस हा ग्रीक कोशकार सांगतो. टर्टीअसची कविता त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे.

कुलकर्णी, अ. र.