हॅलॉयसाइट : एक मृद्-खनिज. हे खनिज वरवर पाहता अस्फटिकी असून त्याची संरचना चादरीसारखी असते. हे खनिजद्वितीयक पद्धतीने तयार होताना त्याचे अतिसूक्ष्म कण तयार होतात आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे प्रकाशकीय गुणधर्म स्पष्टपणे दिसत नाहीत. मात्र, त्याची सममिती एकनताक्ष दिसत असल्याने द्वि-अक्षीय आहे ि? स्फटिकविज्ञार्नें. रंग पांढरा किंवा त्याच्या पिवळसर, लालसर, तपकिरी वा हिरवट छटा आढळतात. कस पांढरा वि.गु. २–२.२ कठिनता १-२ चमक मंद व मातकट अपारदर्शक भंजन उपशंखाभ.रा. सं. Al4Si2O5(OH)42h2O. [→ खनिजविज्ञान].

 

फेल्स्पाराचा उत्तापजलीय विद्राव होऊन अथवा भूपृष्ठाची झीजहोताना हॅलॉयसाइट तयार होते. काहींच्या मते ते सर्पेंटाइन गटातीलखनिज आहे. बेल्जियम, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व यूरोपातील इतरकाही देशांत ते आढळते. उच्च क्षमतेचे सिमेंट व उच्च दर्जाच्या चिनी मातीच्या वस्तू बनविण्यासाठी त्याचा वापर होतो.

 

हॅलॉयसाइट हे खनिज भूवैज्ञानिक ओमेलियस द हॅलॉय (१७०७–७९) यांना बेल्जियममध्ये सर्वांत आधी आढळले. त्यांच्या नावावरून १८२६ मध्ये या खनिजाला हॅलॉयसाइट हे नाव देण्यात आले.

 

पहा : मृद्-खनिजे.

बरीदे, आरती