हँडल, झॉर्झ फ्रेडरिक : (२३ फेब्रुवारी १६८५–१४ एप्रिल १७५९). जर्मनीत जन्मलेला इंग्रज संगीतकार. हँडल व त्याचा समकालीन जर्मन संगीतकार ⇨ योहान झेबास्टिआन बाख (१६८५–१७५०) हे दोघे उत्तर-बरोक कालखंडातील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानले जातात. विकसित बरोक संगीताची सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या संगीतरचनांत आढळतात. बाखच्या तुलनेत हँडल हा सार्वजनिक जीवनात जास्त प्रसिद्धी पावला असला, तरी त्याच्या ऑपेरा संगीतरचनांना मान्यता व प्रतिष्ठा मिळण्यास पुढे सु. २०० वर्षांचा काळ (एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध) जावा लागला.
हँडलचा जन्म हाल (जर्मनी) येथे झाला. त्याचे वडील त्या काळातील यशस्वी शल्यविशारद होते व आई ल्यूथरन पंथीय धार्मिक कुटुंबातून आली होती. हँडलची सांगीतिक गुणवत्ता त्याच्या बालवयातच लक्षात आल्याने आईवडिलांनी त्याला संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्याने संगीत शिकण्यास सुरुवात केली. संगीताचे प्राथमिक धडे त्याने फ्रेडरिक त्साको याच्या हाताखाली गिरवले. त्याने ऑर्गन व व्हायोलिन वादन आणि संगीतरचना करण्यात प्रावीण्य संपादन केले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तो हाल येथील कॅथीड्रलमध्ये साहाय्यक ऑर्गन-वादक म्हणून काम करीत होता. युवावस्थेत त्याने ल्यूथरन पंथीय धार्मिक शिक्षण घेतले. पुढे त्याने हाल विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला (१७०२). संगीतकार म्हणून त्याच्या का र कि र्दी ची सुरुवात १७०३ मध्ये हँबर्ग येथे झाली. हँबर्ग हे त्याकाळी फ्रेंच, इटालियन वजर्मन ऑपेरा-संगीतशैलींचे मध्यवर्ती केंद्र म्हणून नावाजले होते. तेथेऑपेरा वाद्यवृंदात तो व्हायोलिन व हार्पसिकॉर्ड ही वाद्ये वाजवत असे. १७०५ मध्ये त्याचा पहिला ऑपेरा अल्मीरा चा यशस्वी प्रयोग त्यानेहँबर्ग येथे केला. १७०६–१० या काळात तो इटलीमध्ये होता. हाकाळ त्याच्या सांगीतिक जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. ह्या काळात त्याने इटालियन भाषेत अनेक ऑपेरा-रचना केल्या. १७१० मध्ये तो लंडनला गेला. त्याचा रिनाल्डो हा ऑपेरा १७११ च्या प्रारंभीलंडनला सादर करण्यात आला. तेथे त्याचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत झाले व त्याने इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. १७२६ मध्ये त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. त्याचे वास्तव्य अखेरपर्यंत लंडन येथेच होते. ‘रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक ङ्खचा संचालक या नात्याने त्याने अनेक ऑपेरांच्या संगीतरचना केल्या (१७२०–२८). त्याने ४५ इटालियन ऑपेरा-रचना केल्या. पुढे ऑपेराची लोकप्रियता ओसरत गेली व ऑरेटोरिओ लोकप्रिय होत गेले, तसे हँडलने ऑरेटोरिओ-रचनांवर आपले लक्ष केंद्रित केले.
हँडलने पश्चिमी संगीताच्या जवळजवळ सर्वच क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संगीतरचनांची भर घातली असली, तरी त्याची सांगीतिक कामगिरी मुख्यत्वे रंगभूमीशी संलग्न संगीतरचनांच्या क्षेत्रात जास्त उठावदार व मौलिक ठरली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इटालियन ऑपेरा [→ संगीतक] व उत्तरकाळात इंग्लिश ⇨ ऑरेटोरिओ ह्या प्रकारांत त्याने केलेल्या संगीतरचना विशेष उल्लेखनीय आहेत. आधुनिक ऑ रेटोरिओचे गुणधर्म हँडल व बाख या दोघा संगीतकारांनी निश्चित केले. हँडल इंग्लंडला गेला, त्या काळात इंग्लंडमध्ये इटालियन ऑपेरा तसा नवा व अपरिचित होता. तेथे त्यास लोकप्रियता मिळवून देण्याचे श्रेय बव्हंशी त्याने केलेल्या इटालियन शैलीच्या ऑपेरा-रचनांकडे जाते. हँडलच्या ऑपेरांपैकी ज्यूलिओ सीझर (१७२३), ऑर्लँडो (१७३३) व अल्सिना (१७३५) ह्या ऑपेरा-रचना जास्त प्रसिद्ध होत्या. त्याच्या ज्यूलिओ सीझर व अल्सिना ह्या ऑपेरा-रचना आधुनिक काळातही रंगभूमीवर सादर करण्यात आल्या तेव्हा त्यांतील नाट्यमयता व आवाहकता अद्यापही प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवण्यास समर्थ असल्याचे दिसून आले. नाट्यपूर्ण संगीतरचनांचा आविष्कार करणारा तो एक श्रेष्ठ संगीतकार असल्याचे ह्या ऑ पेरांनी दाखवून दिले तथापि हँडलची ख्याती विशेषकरून आहे, ती त्याच्या ऑ रेटोरिओ-संगीतरचनांसाठी. ऑ रेटोरिओ ह्या मुख्यत्वे धार्मिक विषयांवर आधारलेल्या भव्य नाट्यपूर्ण संगीतरचना असतात व त्यांत एक गायकी (सोलो), वृंदगान (कोरस) व वाद्यवृंद ( ऑर्केस्ट्रा) यांचा सुसंवादी व सुरेल मेळ साधलेला असतो. हँडलने १७३२ मध्ये बायबल मधील ‘इस्टर’ ह्या कथेवर आधारित ऑ रेटोरिओ पुनर्रचित करून प्रेक्षकांपुढे सादर केला. इंग्लंडमध्ये सार्वजनिक रीत्या सादर झालेल्या त्याच्या ह्या पहिल्याच ऑ रेटोरिओला अभूतपूर्व यश लाभल्या-नंतर त्याने इंग्रजी भाषेत अनेक ऑ रेटोरिओ संगीतबद्ध केले. हँडलने आपल्या बव्हंशी ऑरेटोरिओ-रचना बायबल मधील कथांवर आधारल्या. त्यातही ‘जुन्या करारा ङ्खवर जास्त भर होता. मिसाया ही त्याची सर्वश्रेष्ठ ऑ रेटोरिओ-रचना मात्र ह्याला अपवाद आहे. त्यात नाट्यपूर्ण कथासूत्र नाही. हँडलचा मित्र चार्ल्स जेनेन्स ह्याने बायबल मधील पवित्र वचनांचे जे संकलन केले, ती वचने हँडलने मिसायामध्ये संगीतबद्ध केली आहेत. ही पवित्र वचने म्हणजे ख्रिस्ती धर्माचे जणू पायाभूत अधिष्ठानच असल्याने, त्यांना संगीतकृतींच्या मालिकांतून आविष्कृत करणाऱ्या मिसायाला धार्मिक माहात्म्य व पावित्र्य प्राप्त झाले. ही ऑ रेटोरिओ-रचना भाविकांमध्ये श्रद्धेय ठरली. हँडलच्या अनेक ऑरेटोरिओ-रचना प्रथमतः रंगभूमीवर सादर करण्यात आल्या. मिसाया ही रचना प्रथमतः १७४२ मध्ये डब्लिनमधील रंगमंचावर सादर करण्यात आली. मिसाया तील भव्य प्रमाणावरील गायक-वृंदाची समूहगीते फार लोकप्रिय ठरली. त्यांतील विविध भावभावनांचे आविष्कार व तांत्रिक वैविध्ये लक्षवेधक होती. सॉल (१७३९) ही हँडलची ऑ रेटोरिओ-रचना त्यातील नाट्यमयतेसाठी प्रसिद्ध आहे. इझ्राएलचा राजा सॉल व गोलायथ राक्षसाचा वध करणारा तरुण योद्धा डेव्हिड यांच्यातील नाट्यमय संघर्षाची कथा ह्यात संगीतबद्ध केली आहे. त्याच्या अन्य ऑ रेटोरिओंमध्ये इझ्राएल इन ईजिप्त (१७३९) व जेप्था (१७५२) ह्या रचना उत्कृष्ट आहेत. त्याच्या ⇨ चर्च-संगीतरचनांमध्ये चँडोस अँथेम्स (१७१८) व कॉशेनेशन अँथेम्स (१७२७) ह्या संगीतरचना विशेष उल्लेखनीय आहेत. त्याने प्रामुख्याने कंठसंगीतरचना जास्त प्रमाणात केल्या असल्या, तरी त्याच्या वाद्यवृंदरचनाही विपुल व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या सु. १५० आहेत. त्यांतील वॉटर म्युझिक (१७१७) व म्युझिक फॉर द रॉयल फायरवर्क्स (१७४९) ह्या सर्वोत्कृष्ट मानल्या जातात. तसेच ⇨ चेंबर म्युझिक (तीनपासून आठपर्यंत वाद्ये असलेल्या लहान वाद्यवृंदासाठी केलेल्या संगीतरचना) साठी त्याने केलेल्या संगीतरचना–विशेषतः ‘काँचेर्टो ग्रोसी’ – उल्लेखनीय आहेत. बरोक संगीत-शैलीचा तो उत्कृष्ट आविष्कार मानला जातो, तसेच त्याने हार्पसिकॉर्डवर वाजवावयाच्या एकवादकी (सोलो) रचना केल्या.
हँडलला १७५२ च्या सुमारास अंधत्व आले तथापि आयुष्याच्या अखेरपर्यंत तो कार्यरत होता. मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याने मिसायाचे’ होली वीक’ मध्ये (ख्रिश्चन चर्चमधील ‘ईस्टर संडे’ पूर्वीचा पवित्रसप्ताह) सादरीकरण केले.
उत्तरकालीन यूरोपीय संगीतकारांवर त्याचा प्रभाव विशेषकरून जाणवतो. बेथोव्हनने त्याला ‘आमच्यातील सर्वश्रेष्ठ संगीतकार’ म्हणून आदराने गौरविले आहे.
लंडन येथे त्याचे निधन झाले व वेस्टमिन्स्टर ॲबे येथे त्याचे दफन करण्यात आले.
इनामदार, श्री. दे.