हार्प :  तंतूवाद्यांपैकी छेडगटातील एक लाकडी तंतुवाद्य. धनुष्य ह्या आयुधाच्या टणत्कारातूनच ‘हार्प’ या वाद्याच्या निर्मितीची कल्पनानिघाली असावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. धनुष्याची निर्मिती ववापर जसा अतिप्राचीन काळापासून केला जातो, त्याप्रमाणेच ‘हार्प ङ्खया वाद्याचीही निर्मिती व वापर प्राचीन काळापासून केला जात होता,असे उत्खनित पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. प्राचीन ईजिप्त संस्कृतीत आणि मेसोपोटेमियात इ. स. पू. ३००० पासून हार्प वापरात असल्याचे दाखले व चित्रे आढळतात. हे वाद्य उभट असून दोन्ही हातांच्या बोटांनी त्यातील तारा पूर्वी छेडीत असत मात्र मेसोपोटेमियात काही आडव्या आकारांचे हार्प आढळले आहेत. गेल्या पाच हजार वर्षांच्या काळात या वाद्याच्या आकार-प्रकारात अनेक बदल झाले, तसेच तारांच्या संख्येतही वृद्धी झाली. ग्रीक व रोमन संस्कृतींत त्याचा वापर फारसा केला जात नसावा मात्र इराण, ईजिप्त, बॅबिलन इत्यादी ठिकाणी या वाद्याची निर्मिती व वापर होत असे.

 

हार्प या वाद्याचे आकार असंख्य आहेत मात्र त्याचा नादक किंवा सहकंपक सामान्यतः लाकडी किंवा चामड्याचा असतो. अतिप्राचीन, प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन व सांप्रत मानवी कल्पकतेप्रमाणे हे वाद्य बऱ्याच स्थित्यंतरातून गेले असून याला विद्यमान मूर्तस्वरूप १८२० मध्ये प्राप्त झाले. त्याचे श्रेय सेबास्तियन एरार्द (१७५२–१८३१) या फ्रेंच संशोधकाकडे जाते. आधुनिकद्विक्रियायुक्त पेडल हार्पमध्ये प्राचीन हार्पचे प्रारूप व ध्वनी यांचा संयोग झाला असून द्वादश अ र्ध स्व रीसप्तकाचा (क्रोमॅटिकस्केल) आ वा का साधण्यासाठी त्याची रचना क्लिष्ट केली आहे.

 

हार्प या वाद्याचे चौकोनी, त्रिकोणी, अर्धवर्तुळाकार, आडवे, उभे असे विविध आकार आहेत. हार्पला एकपासून असंख्य तारा लावता येतात. या तारांची मर्यादा आठ सप्तकांपर्यंत जाऊ शकते.’ पेडलहार्प’ या आधुनिक प्रकारामध्ये तारांची पिच किंवा स्वराची उंची हवी तशी व हवी तेव्हा पायपट्टीवर( पेडल) पाय ठेवून बदलता येते.

 

हार्प म्हणजे अर्धवर्तुळाकार चौकोनी/त्रिकोणी लाकडी चौकट (फ्रेम ). लाकडी फळीच्या सपाटीत तारा अडकवून त्या फ्रेमच्या वरील बाजूस खुंट्यांना गुंडाळलेल्या असतात. हे वाद्य लाकडी वा हस्तीदंती पट्टी किंवा नखीने छेडले जाते. नको असलेला गोंगाट डाव्या हाताच्या बोटांच्या स्पर्शाने बंद करता येतो. हार्पवरून पियानोची कल्पना सुचली असावी.

मुजुमदार, आबासाहेब