स्कॉट, पॉलमार्क : (२५ मार्च १९२०–१ मार्च १९७८). ब्रिटिश कादंबरीकार. जन्म साउथगेट मिड्लसेक्स येथे. त्याची आई दक्षिण लंडनमधील एक श्रमिक, कलादृष्टी आणि सा मा जि क महत्त्वाकांक्षा असलेली अशी होती. आपल्या आईमध्ये असलेली सर्जनशीलवृत्ती आणि व डि लां ची व्यावहारिक व्यापारीवृत्ती ह्यां च्या ती ल फरक पॉलला तीव्रतेने जाणवत असे. ‘ विंचमोअर हिल कॉ ले जि ए ट स्कूल ’ मध्ये शिकत असताना त्याला घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. १९४० मध्ये तो ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. सैन्यात असतानाच त्याचा नॅन्सी एडिथ ॲव्हरी हिच्याशी १९४३ मध्ये विवाह झाला. दुसर्या म हा यु द्धा च्या काळात सैन्यातील एक अधिकारी म्हणून त्याला भारतात पाठवण्यात आले. दुसर्या महायुद्धाच्या अखेरीस कॅप्टन ह्या हुद्द्यावर तो होता. धार्मिक स्वरूपाच्या काही कविता लिहून त्याने साहित्यिक म्हणून आपल्या कारकीर्दीचा आरंभ केला पण खर्या अर्थाने हा आरंभ सुरू झाला, तो जॉन साहिब (१९५२) ह्या त्याच्या पहिल्या कादंबरीने. त्यानंतर द एलिअन स्काय (१९५३, सिक्स डेज इन मारापोर ह्या नावाने अमेरिकेत प्रसिद्ध ), ए मेल चाइल्ड (१९५६), द मार्क ऑफ द वॉरिअर (१९५८), द चायनीज लव्ह पॅव्हिलिअन (१९६०) ह्या त्याच्या कादंबर्या प्रसिद्ध झाल्या. १९६० मध्ये त्याने केवळ लेखनावर आपली उपजीविका करण्याचा निर्णय घेतला.
भारतातले त्याचे अनुभव, त्याचप्रमाणे त्याचे सैनिकी जीवन ह्यांचा उपयोग त्याने आपल्या कादंबरीलेखनासाठी करून घेतला. मित्र किंवा भाऊ ह्यांच्या संबंधांतले ताण, ब्रिटिश साम्राज्यात समाजात काहींना मिळणारे विशेषाधिकार, जुलूमाने जाचलेले सामाजिक वर्ग, वंशभेदानुसार होणारे स्तरीकरण ह्यांसारखे विषय त्याच्या कादंबर्यांतून आलेले आहेत. एकेका कादंबरीबरोबर त्याच्या आशयचित्राचा फलक अधिकाअधिक व्यापक होत गेलेला आहे. द एलिअन स्काय मध्ये मिश्र वंशाची ( ब्रिटिश-भारतीय ) असूनही आपण गोर्या समाजातल्या आहोत, असे भासवणार्या एका स्त्रीच्या मनाचा वेध घेतलेला आहे. ए मेल चाइल्ड मध्ये कुटुंबातला एक सदस्य साम्राज्यवाद्यांच्या सेवेत गमावल्यामुळे कुटुंबावर होणारे परिणाम दाखविले आहेत. द चायनीज लव पॅव्हिलिअन या कादंबरीमध्ये जपानने व्यापलेल्या मलायातील घटना चित्रित केल्या आहेत तथापि पॉल स्कॉट प्रसिद्ध आहे, तो राज क्वार्टेट ह्या त्याच्या कादंबरीचतुष्ट्यामुळे. ह्या कादंबर्यांतून आशयाचे नवे रूपबंध शोधणे आणि घटना घडण्यासाठी नवनव्या स्थळांचा उपयोग करणे ही त्याची लेखनवैशिष्ट्ये प्रत्ययास येतात.
१९६४ मध्ये स्कॉट आपल्या जुन्या मित्रांनाड्ढ भारतीय तसेच अँग्लो–इंडियनड्ढ स्वतंत्र भारतात भेटण्यासाठी आणि येथील वास्तव्यात आपल्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आला पण तसे झाले नाही. त्याच्यापदरी निराशा आली.
लंडन शहरी तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..