स्वयंभू देवता : मूळचा, स्वतः उत्पन्न होणारा, स्वतः एखाद्या पाषाणात प्रादुर्भूत झालेला किंवा दृष्टांताने सापडलेला, असा ‘ स्वयंभू ’चा अर्थ आहे. ज्या देव-देवतांच्या मूर्तींची निर्मिती व स्थापना कोणी केली हे माहीत नसते, अशा मूर्ती ‘ स्वयंभू ’ म्हणजे आपल्या आपण उत्पन्न झालेल्या मानल्या जातात. त्यांच्याविषयी अनेक समजुती प्रचलित आहेत. (१) ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेली शिवलिंगे, (२) योगसाधनेत ज्यांचे प्राणोत्क्रमण झाले, अशा योग्यांच्या शुष्क झालेल्या शवांची स्वयंभू लिंगे, (३) नैसर्गिक उत्पाताने गुप्त झालेल्या व नंतर सापडलेल्या मूर्ती व (४) काही पाषाणखंडातील एखाद्या देवतेची ओबडधोबड मूर्ती वा तांदळा यांना स्वयंभू देवता म्हणतात.

वाड, विजया