कैशिकता : अतिशय लहान व्यासाचे छिद्र असणाऱ्या नलिकेमध्ये (केशनलिकेमध्ये) वा मार्गामध्ये ⇨पृष्ठताणामुळे दिसून येणारा आविष्कार. द्रवामध्ये केशनलिका अर्धवट बुडविली असता बाहेरच्या द्रवपातळीपेक्षा केशनलिकेतील द्रवाची पातळी जास्त असते (उदा., पाणी) किंवा कमी असते (उदा., पारा). ज्या द्रवांचा स्पर्शकोन (घन-द्रव आंतरपृष्ठ व द्रव-हवा आंतरपृष्ठ यांतील कोन) ९०° पेक्षा कमी असतो ते द्रव केशनलिकेत वर चढतात, तर ज्यांचा स्पर्शकोन ९०पेक्षा जास्त असतो अशा द्रवांची केशनलिकेतील पातळी बाहेरच्या द्रवपातळीपेक्षा कमी असते.

शिरोडकर, सु. स.