व्हेर्नर कार्ल हायझेनबेर्कहायझेनबेर्क, व्हेर्नर कार्ल : (५ डिसेंबर १९०१–१ फेब्रुवारी १९७६). जर्मन भौतिकीविद व तत्त्वज्ञ. आव्यूहांच्या [→ आव्यूह सिद्धांत] भाषेत पुंजयामिकी हे आधुनिकविज्ञान सूत्रबद्ध करण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला (१९२५).या शोधामुळे त्यांना १९३२ सालचे भौतिकीचे नोबेल पा रि तो षि कदेण्यात आले. त्यांनी १९२७ मध्ये अनिश्चिततेचे तत्त्व प्रसिद्ध केले. या तत्त्वावर त्यांनी स्वतःचे तत्त्वज्ञान उभारले. यांशिवाय संक्षोभाच्या जलगतिकीविषयीचे सिद्धांत, अणुकेंद्र, लोहचुंबकत्व, विश्वकिरण व मूलकण या विषयांतील त्यांची कामगिरी मोलाची आहे. त्यांनी जर्मनीतील कार्लझ्रूए येथील दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पहिल्या अणुकेंद्रीय विक्रियकाचा आराखडा तयार केला होता. तसेच त्यांनी हायड्रोजनाचे दोन समस्थानिक आहेत, असेही सुचविले होते.

 

हायझेनबेर्क यांचा जन्म वुर्ट्सबर्ग (जर्मनी) येथे झाला. त्यांनी म्यूनिक विद्यापीठात आर्नोल्ट झोमरफेल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली सैद्धांतिक भौतिकीचे अध्ययन केले. त्यानंतर त्यांनी द्रायुप्रवाहांतील संक्षोभावर शोधनिबंध लिहून पीएच्.डी. पदवी मिळविली (१९२३). त्यांनी गटिंगेन विद्यापीठात माक्स बोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली सैद्धांतिक भौतिकीचे अध्ययन केले आणि तेथेच ते १९२४ मध्ये व्याख्याता झाले. त्यांनी कोपनहेगन येथील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल फिजिक्समध्ये नील्स बोर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्यानंतर हायझेनबेर्क लाइपसिक विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक होते (१९२७–४१). ते बर्लिन येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्सचे संचालक होते (१९४२–४५). १९४६ मध्ये ते गटिंगेन येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्स अँड ॲस्ट्रोफिजिक्सचे संचालक झाले. १९५४ मध्येते सेर्न संघटित करणारे जर्मन प्रतिनिधी झाले. हायझेनबेर्क यांनी बर्लिन (१९४१–४५), गटिंगेन (१९४६–५८) व म्यूनिक (१९५९) विद्यापीठांत भौतिकीचे अध्यापन केले.

 

हायझेनबेर्क यांनी १९२०–३० दरम्यान आणवीय कणांना लावण्यात येणाऱ्या यामिकीमधील मूलभूत संकल्पनांचे एक मौलिक पुनर्भाष्य प्रस्तावित केले. त्यांचे हे निष्कर्ष नशळींलहीळषीं षश्ची झहूीळज्ञ या नियत-कालिकात प्रसिद्ध झाले. या लेखाचा इंग्रजीतील शीर्षकार्थ ‘अबाउट द क्वांटम-थिऑरेटिकल रिइंटरप्रिटेशन ऑफ कायनेटिक अँड मेकॅनिकल रिलेशनशिप्स’ असा होता. नियत मार्गांतून फिरणाऱ्या पृथक् (विविक्त) कणांची अस्तित्वात असलेली प्रतिकृती बाजूला ठेवून त्यांनी नवा मार्ग सुचविला. यामध्ये असे आविष्कार निरीक्ष्य वा मापनीय राशींत निदर्शित करतात. या राशी आव्यूह बीजगणिताचे नियम पाळणाऱ्या संख्यांनी व्यक्त करता येतात. हायझेनबेर्क व इतर वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले की, आव्यूह सिद्धांताचा वापर केल्यास कणांच्या पातळीवरील भौतिकीय चल राशींसाठी संभाव्य मूल्यांचा संच विनिर्देशित करता येऊ शकेलआणि व्यवच्छेदक ऊर्जा-अवस्था आणि या ऊर्जा-अवस्थांमधीलसंक्रमणे घडण्यासाठीच्या गणितीय रीतीने व्यक्त होणाऱ्या संभाव्यतांचीतरतूद करता येऊ शकेल.

 

हायझेनबेर्क यांच्या पुंजसिद्धांतावरील संशोधन कार्यानंतर आणवीय व अणुकेंद्रीय भौतिकीच्या विकासावर अतिशय प्रभाव पडला. त्यांनी लिहिलेले द फिजिकल प्रिन्सिपल्स ऑफ द क्वांटम थिअरी हे पुस्तक १९३० मध्ये प्रसिद्ध झाले. याव्यतिरिक्त त्यांनी पुंजयामिकी, आणवीय भौतिकी, विश्वकिरण इ. विषयांवर अनेक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक लेखनही केले, कारण भाग व समष्टी आणिएक व अनेक या प्राचीन समस्यांविषयी निर्माण झालेल्या नवीनमर्मदृष्टीमुळे सूक्ष्मभौतिकीतील शोधाला साहाय्य होईल असे त्यांचे मतहोते. तसेच काही विशिष्ट परिमाणांच्या जोड्यांमधील – उदा., एखाद्याकणाचे स्थान व त्याचा संवेग (द्रव्यमान × वेग), ऊर्जा आणि काल –दोन्ही परिमाणे एकाच वेळी अमर्यादित अचूकतेने मोजता येत नाहीत, या त्यांच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचाही तत्त्वज्ञानविषयक विचारांवर परिणाम झाला. यांमुळे हायझेनबेर्क हे विसाव्या शतकातील एक कल्पक व प्रभावशाली विचारवंत असल्याचे सर्वत्र मानले जाते.

 

हायझेनबेर्क यांना नोबेल पारितोषिकाशिवाय माक्स प्लांक पदक, मात्त्यूत्सी पदक, कोलंबिया विद्यापीठाचे बर्नार्ड कॉलेज पदक तसेच अनेक मानसन्मान मिळाले. ते रॉयल सोसायटीचे (लंडन) फेलो व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते.

 

हायझेनबेर्क यांचे म्यूनिक (जर्मनी) येथे निधन झाले.

 

पहा : अनिश्चिततेचे तत्त्व पुंजयामिकी पुंज क्षेत्र सिद्धांत.

 

संदर्भ : 1. Hermann, Arwin, Werner Heisenberg 1901–76, 1976.

           2. Weizsacker, Carl F. von, Werner Heisenberg, 1977.

ठाकूर, अ. ना.