कीटवे : झँबियाच्या तांब्याच्या खाणभागातील महत्त्वाचे ठिकाण. लोकसंख्या १.६०,००० (१९६७ अंदाज). एन्दोलाच्या वायव्येस ४८ किमी. अंतरावरील हे शहर लोहमार्गाचे आणि सडकांचे मोठे केंद्र आहे. १९६१ पासून एन्कानाचा खाणप्रदेश कीटवेला जोडण्यात आल्यामुळे ह्या शहराचे महत्त्व वाढले आहे.

लिमये, दि. ह.