ग्वांतानामो : क्यूबाच्या ग्वांतानामो आखाताजवळील साखर व कॉफी यांचे केंद्र. लोकवस्ती १,३०,०६१ (१९७० अंदाज). हैतीतून आलेल्या हद्दपार फ्रेंचांचा प्रभाव येथील वास्तुशिल्पावर दिसतो. आखातावरील अमेरिकेच्या प्रचंड आरमारी तळामुळे ग्वांतानामोचे महत्त्व वाढले. क्यूबात कास्ट्रो राजवट आल्यापासून तळ उठविण्यासाठी दडपण येत आहे. परंतु १९०३ च्या कराराच्या आधाराने अमेरिका ही मोक्याची जागा सोडण्यास नकार देत आहे. १९६१ मध्ये क्यूबा-अमेरिका संबंध तुटल्यापासून तळावर ग्वांतानामोच्या लोकांना मिळणारा कामधंदाही बंद पडला आहे.
शहाणे, मो. ज्ञा.