ग्रेॲम्सटाउन : दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या केप प्रांतातील शहर. लोकसंख्या ४१,o८६ (१९७o अंदाज). हे पोर्ट ईलिझाबेथपासून १३४ किमी. असून दुभते-फळे-लोकर उत्पादक प्रदेशाचे आणि सुप्रीम कोर्टाच्या पूर्व विभागाचे केंद्र आहे. ख्रिस्ती प्रार्थना मंदिरे, रोड्स विद्यापीठ, अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय, ऑल्बनी संग्रहालय, वनस्पती उद्यान, स्त्रियांसाठी शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, कलावीथी, विमानतळ इत्यादींमुळे ते महत्त्वाचे आहे. कर्नल ग्रेअम्सच्या मूळच्या लष्करी छावणीवरून याचे नाव पडले.

लिमये, दि. ह.