गोल्डन गेट : अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागर व सॅन फ्रॅन्सिस्कोचा उपसागर यांना जोडणारी सामुद्रधुनी. ही सु. ३ किमी. रुंदीची असून तीवर १९३७ साली १,२८० मी. लांबीचा झुलता पूल बांधण्यात आला आहे. सर्वांत लांब पुलांपैकी हा एक असल्याने पर्यटकांचे हे आकर्षणकेंद्र बनले आहे.

लिमये, दि. ह.