गोंडवन : गोंड लोकांच्या वस्तीचा भारताच्या मध्यभागातील प्रदेश. चौदाव्या शतकातील मुस्लिमांनी प्रथम गोंड व गोंडवन हे शब्द वापरले. सातपुड्याचा पठारी प्रदेश अबुल फज्लच्या वर्णनांशी बहुतेक जुळता आहे. गोंड राजे मोगलांचे मांडलिक परंतु बव्हंशी स्वतंत्रच होते. सतराव्या शतकात मराठ्यांनी हा मुलूख जिंकल्यावर तो नागपूरकर भोसले आणि निजाम यांच्या राज्यात गेला. १८५३ पर्यंत बहुतेक गोंडवन ब्रिटिशांच्या सत्तेखाली आले. १९४७ पर्यंतही काही छोटी गोंड संस्थाने अस्तित्वात होती. आता हा प्रदेश मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांत विभागला गेला आहे. 

कुमठेकर, ज. ब.