गुजरात – २ : पाकिस्तानच्या पंजाब विभागातील गुजरात जिल्ह्याचे मुख्य शहर. लोकसंख्या ७३,००० (१९६९ अंदाज).  हे चिनाब नदीच्या उजव्या तीराजवळ, लाहोरच्या उत्तरेस ११२ किमी. असून येथे गहू, तांदूळ, कापूस आदींचा व्यापार चालतो.  धातुकाम, पितळी भांडी, हातमाग कापड, पादत्राणे, विद्युत् पंखे यांचे लहानलहान कारखाने येथे असून चिनी मातीची भांडी व सोन्या-चांदीचे जडावकाम यांकरिता गुजरातची ख्याती आहे. अकबराने येथे १५८० मध्ये किल्ला बांधला, त्यानंतर शहराची वाढ झाली.

ओक, द. ह.