ओशोग्बो : नायजेरियाच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे शहर. लोकसंख्या २,४२,३३६ (१९६९ अंदाज). हे ओशून नदीच्या काठी ईबादानच्या ईशान्येस लोहमार्गाने ८० किमी. आहे. कापड विणणे, रंगविणे, कापसाचे गठ्ठे बांधणे, कोको, तंबाखूचे पदार्थ, ताडफळे व त्याचे तेल यांचे उत्पादन करणे हे येथील उद्योग असून कापूस, याम, कसाव्हा, मका, केळी वगैरेंचे उत्पादन आजूबाजूच्या प्रदेशात होते. त्यामुळे हे व्यापाराचे आणि दळणवळाचे केंद्र बनले आहे. याशिवाय येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

लिमये, दि. ह.