एरिना : ग्रीक कवयित्री. रोड्झजवळील टीलॉस बेटात राहत असे. युसीबिअसच्या मताप्रमाणे ती इ. स. पू. चौथ्या शतकाच्या मध्यात होऊन गेली असावी. बॉसिस या तिच्या मित्राच्या स्तुतिपर तिने Elakate हे हेक्झॅमीटरमधील ३०० कडव्यांचे काव्य लिहिले. ती वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच मृत्यू पावली.

हंबर्ट, जॉ. (इं) जगताप, बापूराव (म.)