क्रिव्हाइ रोग : रशियाच्या युक्रेन राज्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ६,०८,००० (१९७३). हे नेप्रोपेट्रॉफ्स्क शहराच्या नैर्ऋत्येस १२८ किमी., डोनेट्स कोळसा विभागाच्या पश्चिम कडेवर, इंगुलेट्स व सक्सगान्य नद्यांच्या संगमावर वसलेले असून आसमंतात लोखंडाच्या समृद्ध आणि विपुल खाणी आहेत. येथे कोळसा, पोलाद, अवजड यंत्रे व त्यांचे सुटे भाग, सिमेंट, लाकूडकाम, खाद्यपदार्थ यांचे उद्योग असून दळणवळणाचेही हे केंद्र समजले जाते. येथे खनिकर्म व शिक्षक महाविद्यालये आहेत. दुसर्या महायुद्धात जर्मनांनी शहराची बरीच हानी केली महायुद्धात जर्मनांनी शहराची बरीच हानी केली महायुद्धानंतर आधुनिक पद्धतीवर शहराची व उद्योगधंद्यांची पुनर्रचना झाली आहे.
लिमये, दि. ह.