कुर्डुवाडी : सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील बाजारपेठ लोकसंख्या १७,८६२ (१९७१). मुंबई–पुणे–सोलापूर–मद्रास आणि मिरज–पंढरपूर–बार्शी–लातूर या रेल्वेमार्गांचे हे प्रस्थानक असून सडकांनी हे सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले असल्याने दळणवळणाचे केंद्र समजले जाते. ज्वारी, बाजरी, कापूस, गहू, भुईमूग, कडधान्ये इत्यादींची ही बाजारपेठ असून सरकी काढणे, तेलघाणे असे उद्योग आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाची येथे सोय आहे.  

कापडी, सुलभा