गरलॉफ्का : रशियाच्या युक्रेन राज्यातील कोळशाच्या खाणींचे शहर. लोकसंख्या ३,३९,००० ( १९७३ ). हे डोनेट्स खोऱ्यात डोनेट्स्कच्या उत्तर-ईशान्येस ४० किमी. असून लोहमार्गाचे केंद्र आहे. ह्याच्या आसमंतात कोळशाच्या खाणी असून येथे खनिकर्म यंत्रे, नायट्रेट खते, कोक वगैरेंचे कारखाने आहेत.

लिमये, दि. ह.