गंगापूर: राजस्थान राज्याच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर. लोकसंख्या ३२,६६० (१९७१). प. रेल्वेवरील हे स्थानक जयपूरपासून सडकेने ११० किमी.  आग्नेयीस आहे. पूर्वीच्या जयपूर संस्थानातील तहसिलीचे हे गाव असून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत येथे औद्योगिक केंद्र स्थापण्यात आले. अनेक लघुउद्योग येथे निर्माण झाले असून त्यांच्या प्रशिक्षणाच्या विशेष सोयी येथे आढळतात.

शाह, र. रू.