पृष्ठ अंत्यरूपण, धातूंचे : संगमरवर, फरशी, सिमेंटची टाइल, काच, प्लॅस्टिक, लाकूड, चिनी मातीच्या वस्तू, कापड, कागद वगैरेंच्या पृष्ठभागांना गुळगुळीतपणा व चमक किंवा तकाकी आणतात ती मुख्यत: त्यांची आकर्षकता वाढविण्यासाठी असते. परंतु धातूंच्या वस्तूंचे किंवा यंत्रातील अथवा इतर रचनात्मक कामातील भागांच्या पृष्ठांचे काही विशिष्ट हेतूसाठी अंत्यरूपण करावे लागते अशा वस्तू किंवा भाग बव्हंशी ⇨यांत्रिक हत्यारे, मुद्रा व मुद्राकारक [⟶ मुद्रा-२], घडीव [⟶ घडाई, धातूची] किंवा ओतीव [⟶ ओतकाम] पद्धती वापरून बनवितात. या पद्धतींतील प्रक्रियांमुळे त्यांच्या पृष्ठभागावर हत्यारांच्या घावाचे वण (ठोके), यंत्रणाने (कर्तन क्रियेने किंवा कातकामाने) पडलेले चरे (ओरखडे), कंगोरे, खरखरीतपणा, कण, सूक्ष्म खळगे किंवा उंचवटे राहतात. यामुळे प्रत्यक्ष वापरात अशा पृष्ठभागांची घर्षणजन्य झीज जास्त होऊन कार्य क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून असे पृष्ठभाग जर गुळगुळीत केले, तर झीज कमी होऊन कार्यक्षमता वाढते. पृष्ठभाग गुळगुळीत करून जर त्याचा चकचकीतपणा आरशासारखा स्वच्छ व प्रकाश परावर्ती केला, तर त्यावर वातावरणातील धूळ जमू शकणार नाही. त्यामुळे पृष्ठभागात दोष निर्माण होण्याची संधीच मिळणार नाही. त्याचप्रमाणे या क्रियेत आकार व आकारमानात अत्यंत सूक्ष्म अचूकपणा आणला जातो. दाढी करण्याच्या पोलादी पात्याची धार जरी डोळ्यांना सरळ दिसून बेटाच्या स्पर्शाला तीक्ष्ण वाटली, तरी सूक्ष्मदर्शक भिगांतून त्या धारेचे स्वरूप केस बिंचरायच्या फणीसारखे दिसते. धार लावण्याच्या क्रियेत त्यातील दंतुरता कमी करतात. धातूंच्या पृष्ठभागांना गुळगुळीतपणा देऊन चकाकी आणण्यासाठी त्यांना अती कठीण (ठिसूळ) पोलादाची धार हत्यारे, गोळ्या किंवा छर्रे, तसेच नैसर्गिक किंवा कृत्रिम अपघर्षकापासून [⟶ अपघर्षक] तयार केलेले घासकागद, घासपट्टे, ठोकळे, कांडया, पिष्टी (पेस्ट) आणि सहाणी वापरून हाताने किंवा यंत्राने घासतात. या क्रियेस ‘अंत्यरूपण’ म्हणतात.
(१)कानसकाम : उच्च कार्बनी पोलादाच्या निरनिराळ्या आकारांच्या कानशींच्या पृष्ठभागावर अंगचे धार दाते ठेवलेले असतात. प्रती सेंमी. लांबीत असणाऱ्या कमीजास्त दात्यांच्या संख्येप्रमाणे त्यांचे अनुक्रमे खरबरीत, बॅस्टर्ड, मध्यम व सूक्ष्म असे प्रकार असतात. वस्तूंचे किंवा भागांचे खरखरीत पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी असे पृष्ठभाग अशा प्रकारच्या कानशींनी क्रमाक्रमाने हाताचा दाब देऊन घासून काढतात. [⟶ कानसकाम].
मोठया प्रमाणावर छिद्रतासणीकाम करण्यासाठी छिद्रण यंत्रात छिद्रतासणी बसवून असे काम करतात.
(७) शाणन : निरनिराळ्या आकाराच्या सहाणी (शाणन चक्रे) निरनिराळ्या अपघर्षकांपासून बनवितात [⟶ अपघर्षक एमरी].
या सहाणी ⇨ शाणन यंत्रात बसवून वेगाने हव्या त्या पातळीत फिरवितात आणि त्यानी धातूंच्या वस्तूंच्या किंवा भागांच्या पृष्ठभागांचे शाणन (पेषण) करून अंत्यरूपण क्रिया करतात. आ. २ मध्ये निरनिराळ्या शाणनक्रिया दाखविल्या आहेत. या पद्धतीने एक मायक्रॉन पर्यत (०.००१ मिमी.) मापांत सूक्ष्मता मिळू शकते. शाणनक्रियेने पृष्ठभागांचे अंत्यरूपण करताना मुबलक थंड कर्तन द्रवाचा प्रवाह चालू ठेवावा लागतो. कारण सहाणींना उच्चशीघ्र गती दिलेली असते.
(८) बहिर्उगाळण : अपघर्षकाचे कण सूक्ष्म व भरड आकारमानाचे ८ ते ६०० मेशचे (चाळणीच्या जाळीत प्रती २.५ सेंमी. लांबीत असलेली छिद्रांची संख्या) तयार मिळतात. त्याचा वापर तेलात किंवा ग्रीजमध्ये मिसळून उगाळण क्रियेसाठी करतात. हाताने व यंत्राने अशा दोन्ही पद्धतींनी धातूंच्या पृष्ठभागांचे अंत्यरूपण अपघर्षकांच्या मदतीने करतात व त्यासाठी २०० ते ६०० मेशचे अपघर्षक कण वापरतात.
त्यामुळे शाणनापेक्षा जास्त गुळगुळीत पृष्ठभागांची निर्मिती होते. आ. ३ मध्ये हाताने करावयाची बहिर्उगाळण क्रिया दाखविली आहे. यात खोबणी पाडलेल्या बिडाच्या सपाट ठोकळ्यावर अपघर्षक पिष्टी पसरून त्यावर वस्तूचा पृष्ठभाग हाताने मध्यम दाब देऊन इंग्रजी आठ (8) आकड्याच्या आकारात घसटून उगाळण क्रिया केली जात असल्याचे दाखविले आहे. बहिर्उगाळण यंत्रात बिडाच्या ठोकळ्याऐवजी फिरते कार्यपट असून त्यावर अपघर्षक पिष्टी पसरून एक किंवा अनेक वस्तू ठेवून कार्यपट झाकून जाईल असा पिंजऱ्याच्या आकाराचा झाकणभाग यंत्रशीर्षातून हवा तेवढा दाब देऊन वरून पक्का बसविलेला असतो. कार्यपटाला परिभ्रमी (बाह्य अक्षाभोवती फिरण्याची) व घूर्णी (स्वत:भोवती फिरण्याची) गती दिल्याने बहिर्उगाळणक्रिया होते. काही यंत्रांत प्रती मिनिटाला ३,६०० कंपने विद्युत् चुंबकाने पुरवून उगाळणक्रिया करण्यात येते. एंजिनात दट्ट्या व दट्ट्याकडी, झडपा व आसने, भुजा, दंड आणि धारवा (बेअरिंग), दांडिका व धारवा पुंगळी, भुजाखीळ व संयोगदांडा किंवा दंतचक्र जोडी, स्क्रू व नट आणि इतर यंत्रांतील अशाच प्रकारच्या सहचरी भागांचे उगाळण केल्याने घर्षण कमी होऊन अनिष्ट आवाज नाहीसे होतात. कुठल्याही अवघड आकाराचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे या पद्धतीने सोपे होते. कारण पृष्ठभागाच्या उलट आकाराच्या लाकडी, ॲल्युमिनियम, पितळ किंवा बीड या धातूंचा अथवा प्लॅस्टिकचा ठोकळा तयार करून अपघर्षक कण वापरल्यास ते त्यांत रुतून बसतात. अशा प्रकारे बहिर्उगाळणक्रियेसाठी उगाळण साधन (लॅप) म्हणून अशा ठोकळ्यांचा उपयोग होतो.
तसेच गेरू, खडू, संगजिरे अशा पदार्थांचाही वस्तूंच्या पृष्ठभागांना उजाळा देण्यासाठी उपयोग करतात. असे चक्र उच्च शीघ्र गतीने फिरत असताना वस्तूचा पृष्ठभाग चक्राच्या अपघर्षकाने माखलेल्या तोंडावर दाबवून धरून सरकवीत ठेवल्याने पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत होऊन त्यावर आरशासारखी अप्रतिम चमक येते.
वैद्य, ज. शि. दाढे, वि. ग. दीक्षित, चं. ग.
“