पल्लवि : कर्नाटक संगीतातील एक संज्ञा. हिंदुस्थानी संगीतातील स्थायीप्रमाणे असणारा हा रचनाविभाग ⇨अनुपल्लवी आणि प्रत्येक ⇨चरण यांनंतर पुनरावृत्त होतो. प्रत्यक्ष कार्यक्रमातील अत्यंत महत्त्वाच्या निर्माणक्षम अवस्थेचाही पल्लवीने निर्देश होतो. राग आणि तान यांचे सविस्तर आविष्कार झाल्यावर पदम्, लयम् आणि विन्यासम् यांच्या अक्षरांनी तयार झालेली ही सर्वांत दीर्घ आविष्कारावस्था होय. पल्लवी कोणत्याही भाषेत, धार्मिक वा लौकिक अशा कोणत्याही विषयावर, कोणत्याही रागात, तालात वा लयीत असू शकते.

रंगाचारी, पद‌्मा (इं.) रानडे, अशोक (म.)