परोपजीवी विज्ञान : (पॅरासिटॉलॉजी). ही जीवविज्ञानाची एक शाखा असून तीमध्ये परजीवी (दुसऱ्‍या जीवावर जगणाऱ्‍या) वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास केला जातो. दुसऱ्‍या जीवावर अवलंबून असणे हा परोपजीवितेचा महत्त्वाचा निकष आहे. यालाच जीवोपजीवन असेही नाव असून या विषयाचे सविस्तर विवरण ‘जीवोपजीवन’ या स्वतंत्र नोंदीत दिलेले आहे.

जमदाडे, ज. वि.