गोविंदवल्लभ पंतपंत, गोविंद वल्लभ – २ : (१० सप्टेंबर १८८७–७ मार्च १९६१). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते. पंतांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील तथापि दहाव्या शतकात त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशात गेले आणि तेथेच स्थायिक झाले. गोविंदवल्लभांचा जन्म अलमोडा येथे झाला. त्यांचे वडील मनोरथ पंत हे जमीनमहसूल खात्यात नोकरी करीत. गोविंदवल्लभांनी अलमोडा येथेच मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. पुढे ते अलाहाबाद येथील म्यूर सेंट्रल कॉलेजमधून बी. ए. झाले (१९०७) व नंतर एल्एल्.बी. झाले (१९०९). या परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे त्यांना लॅम्सडेन सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर गोपाळ कृष्ण गोखले व पंडित मदन मोहन मालवीय या दोन देशभक्तांच्या विचारांचा परिणाम झाला. ‘सार्वजनिक जीवनाचा पहिला धडा मालवीयांकडून मिळाला’, असे ते म्हणत. त्यांनी नैनिताल येथे प्रथम वकिलीस सुरूवात केली. नंतर ते अलाहाबादला वकिल करू लागले. वकिलीच्या व्यवसायात त्यांनी प्रतिष्ठा व पैसा दोन्ही मिळविले. आपल्या प्रदेशातील मागास्वर्गीय जातिजमातींचे प्रश्न सोडिविण्यासाठी, तसेच त्यांच्या समस्यांचासाठी, तसेच त्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कुमाऊँ परिषदेची स्थापना केली (१९१६). तत्पूर्वी १९०५ च्या बनारस काँग्रेस अधिवेशनास ते ह ज र हो ते. १९१६ मध्ये ते काँग्रेसचे क्रि या शी ल स भा स द झाले. शक्ति या वृ त्त प त्रा द्वा रे त्यां नी आ प ल्या प रि ष दे च्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा केला. कुमाऊँ प्रदेशातील सार्वजनिक च ळ व ळी त भाग घे ऊ न त्यांनी भिकाऱ्यांची व्यवस्था, मजुरांची सक्तीने भरती, जंगलवासीयांवरील अत्याचार इ. प्रश्न कुमाऊँ परिषदेतर्फे हाताळले. यावेळी कुमाऊँ प्रदेश अनुसूचित जातिजमातींच्या विभागात अंतर्भूत केला होता. म्हणून त्यांनी साउथबरोच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मताधिकार समितीसमोर योग्य तो पुरावा सादर करून कुमाऊँ प्रदेश या विभागातून अलग करण्यात संपूर्ण यश मिळविले.

उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत ते निवडून आले (१९२३). त्याच वर्षी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदींनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाचे ते सात वर्षे सचिव होते. १९२७ मध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. सायमन आयोगाविरुद्ध लखनौ येथे जी प्रक्षुब्ध निदर्शने झाली त्यावेळी झालेल्या लाठीहल्ल्यात जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांनाही खूप मार बसला. त्याचा परिणाम पुढे त्यांना कंपवाताचे कायमचे दुखणे जडण्यात झाला. म. गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाल्याने त्यांना १९३०–३२ च्या दरम्यान दोन वेळा तुरूंगावास घडला. उत्तर प्रदेशात कृषिविषयक सुधारणा करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षेतेखाली एक समिती नेमण्यात आली. तिचा अहवाल त्यांनी १९३२ साली सादर केला. या त्यांच्या कामगिरीमुळे ते पार्लमेंटरी काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे चिटणीस झाले (१९३४). त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती कायदेमंडळातील काँग्रेसचे उपनेते म्हणून काम केले. १९३७–३९ या काळात ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यावेळी त्यांनीही राजीनामा दिला. १९४० मध्ये त्यांना एक वर्षाचा कारावास भोगावा लागला. ‘छोडो भारत’ आंदोलनात सहभागी झाल्याने इतर नेत्यांबरोबर त्यांनाही अटक होऊन अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. (१९४२–४५). १९४६ मध्ये ते पुन्हा उत्तर प्रदेशात निवडून आले व मुख्यमंत्री झाले. ते संविधान समितीवर होते. स्वातंत्र्योत्तर काळात वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी जवाहरलाल नेहरूंनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून नेमले. या पदावर ते अखेरपर्यंत होते. दिल्ली येथे थोड्याशा आजारानंतर ते मरण पावले.

गोविंदवल्लभ पंत हे एक खंबीर नेते होते, ते कमी बोलत त्यांचा भर प्रत्यक्ष कृतीवर असे. भारतातील सर्वांत मोठ्या घटकराज्याचे सर्वांत जास्त वर्षे ते मुख्यमंत्री होते. आपल्या कारकीर्दीत प्रशासनव्यवस्थेत त्यांनी अनेक आमूलाग्र सुधारणा केल्या उत्तर प्रदेशातील जमीनदारी पद्धत नष्ट करून त्यांनी जमीन सुधारणेचे कायदे केले तेथे शासकीय कार्यालयांतून त्यांनी हिंदी भाषेचा उपयोग सुरू केला एवढेच नव्हे, तर हिंदी भाषेच्या प्रसारासही हातभार लावला. १९३८–३९ मध्ये त्यांच्या प्रोत्साहनाने हिंदीमध्ये पारिभाषिक शब्दकोश तयार झाला. मुख्यमंत्री या नात्याने १९४८ मध्ये देवनागरी लिपी सुधारून हिंदी टंकलेखन-यंत्र व दूरमुद्रक तयार करविण्याचे प्रयत्न त्यांनी केले. गुरुकुल कांगडी, कन्या कुरुकुल, हिंदी साहित्य संमेलन, द. भारत हिंदी प्रचारसभा, राष्ट्रभाषा प्रचारसभा इ. विद्यापीठांची  व संस्थाची परीक्षा प्रमाणपत्रे सरकारी नोकरीत भरतीच्या वेळी ग्राह्य धरावीत, यांसाठी त्यांनी प्रयत्न केले. हिंदी साहित्यका बृहत इतिहास (१६ भाग), हिंदी शब्दसागर, हिंदी विश्वकोश वगैरे महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या मुळाशी त्यांचीच प्रेरणा होती. केंद्रीय गृहमंत्रिपदावर असतानाही केरळमधील कम्युनिस्ट राजवट, पंजाबी सुभा, आसाममधील दंगली इ. प्रश्न त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळले. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला (१९५७). मुत्सद्दीपणा, कणखरपणा, कृतिशीलता आणि संसदपटुता यांसारखे आदर्श नेतृत्वाचे गुण त्यांच्यात होते.

संदर्भ :Savitri Shyam Sundar Shyam, Political Life of Govind Ballabh Pant, Lucknow, 1960.

केळकर, इंदुमति