पंतनगर : उत्तर प्रदेश राज्याच्या नैनिताल जिल्ह्यातील एक शैक्षणिक केंद्र. हे तराई भागात वसले आहे. नैनिताल जिल्ह्याच्या तराई कृषिक्षेत्रालाही ‘पंतनगर कृषिक्षेत्र’ असे म्हणतात. १९६० मध्ये स्थापन झालेले ‘गोविंदवल्लभ पंत कृषि आणि तंत्रविद्या विद्यापीठ’ आणि कृषी, पशुवैद्यक, गृहशिक्षण ही महाविद्यालये येथे आहेत. ह्याच्या आसमंतात ऊस, गहू, तांदूळ, तीळ, हरभरा इत्यादींचे उत्पादन होते.

सावंत, प्र. रा.