क्षुप : (झुडूप) . आकारमानाच्या व जीवमानाच्या संदर्भात मध्यम उंचीच्या कित्येक वनस्पतींना स्वतंत्र असे ठळकपणाने दिसणारे खोडनसून अनेक जाडजूड, कठीण व काष्ठयुक्त फांद्याच जमिनीपासून किंवा जमिनीपासून थोड्या उंचीवर खोडापासून उगवलेल्या आढळतात. ह्यावनस्पती वृक्षापेक्षा लहान, ओषधीपेक्षा मोठ्या व बहुवर्षायू असून त्यांना क्षुप म्हणतात. यांपैकी काही इतर जवळच्या आधारावर आपला भारटाकून वाढतात (उदा., वेली गुलाब, बुगनविलिया इ.), तर काही वेली-प्रमाणे चढतही जातात (उदा., गुळवेल), परंतु इतर सरळ ताठ वाढतात (उदा., जास्वंद, रुई, गुलाब) यांपैकी अनेक क्षुपे बागेतून शोभेकरितालावतात (उदा., क्रोटन, पांढरी किंवा लाल कण्हेर, कोरांटी, डुरांटा, मेंदी इ.) व त्यांचे कुंपणही करतात (उदा., जखमी, नांग्या शेर इ.).

पहा : ओषधि.

 

परांडेकर, शं. आ.