होरी : उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय साधारणपणे राधाकृष्णाच्या लीला हाच असतो.ख्यालाप्रमाणे याची रचना प्रमुख रागांतून सापडते पण यात अस्ताई आणि अंतरा एवढे दोनच भाग असतात. [→ अस्ताई – अंतरा]. गायनात तालाचे महत्त्व जास्त. धमार हा मुख्य पण झुमरा किंवा दीपचंदी हेतालही यासाठी वापरले जातात. ख्यालाप्रमाणे हा गानप्रकार महत्त्वाचा मानतात. क्वचित त्याच्या प्रमुख तालामुळे त्याला धमार असेही म्हणतात. [→ धृपद–धमार]. होळीच्या सणाच्या वेळी याचे गायन जास्त होते. चैतीसारखा हा प्रासंगिक गानप्रकार आहे. 

गोंधळेकर, ज. द.