ताइफ : सौदी अरेबियाच्या हेजॅझ प्रांताचे उन्हाळी ठाणे आणि विश्रामस्थान. लोकसंख्या ३०,००० (१९७०). हे १,६३१ मी. उंचीवर मक्केच्या पूर्व आग्नेयीस ६४ किमी. आहे. हवा उष्ण व कोरडी आहे. हे द्राक्षे, जरदाळू, डाळिंबे यांच्या प्रदेशात असून येथील मद्य व गुलाबअत्तर सुप्रसिद्ध आहे. १९३४ मध्ये येथे झालेल्या येमेन–सौदी अरेबिया सरहद्द तहाची मुदत १९५३ मध्ये वीस चांद्रवर्षांनी वाढविली आहे.

लिमये, दि. ह.