निशिगंध : (गुलछडी, वाकडदांडी, गुलछबू ​हिं. गुलछडी सं. रजनीगंधा इ. ट्युबरोझ, ​सिटी फ्लॉवर लॅ. पॉ​लिअँथस ‌‌‌ट्युबरोझा कुल-ॲमा​रिलिडेसी). ‌‌‌सुगंधी फुलांमुळे लोक​प्रिय झालेली ही ⇨ ओषधी मूळची द. यूरोपातील आ​णि मेक्सिकोतील असून हल्ली अनेक देशांत (उदा., इंग्लंड, फ्रान्स, भारत) लागवडीत आहे. ​हिचे ग्रं​थिल खोड (आवृत कंद) ‌‌‌भू​मिस्थित (ज​मिनीत) असून वायवी (ज​मिनीच्या वर आलेले) खोड ९०–१२० सेंमी. उंच व फुलोऱ्याचा [⟶ पुष्पबंध] ‌दांडा असतो. पाने रेषाकृती, साधी, मूलज (ज​मिनीतील खोडापासून आलेली) व स्कंधोद्‌भव (वायवी खोडावर असलेली) मूलज पाने ६–९ व प्रत्येक पान ३०–४५ X १·५ सेंमी. व तळाशी लालसर असते स्कंधोद्‌भव पाने ८−१२ व लहान असतात. फुलोरा (क​णिश प्रकारचा) डोंगराळ भागात मे–जूनमध्ये व उतरेच्या मैदानात उन्हाळ्यात व पावसाळ्यात (ए​प्रिल ते सप्टेंबरात) येतो. फुले पांढरी, ​द्विलिंगी, सुगंधी, ३·५−६·५ सेंमी. लांब, तळाजवळ वाकलेली साधारण नसराळ्यासारखी असतात. प​रिदले सहा, लहान केसरदले सहा व पाकळ्यांना मध्ये ‌‌‌​चिकटलेली तीन ​किंजदलांचा ​किंजपुट अधःस्थ व तीन

निशिगंध : (१) फुलोरा, (आ) फुलाचा उभा छेद, (इ) केसरदल, (ई) किंजपुटाचा आडवा छेद : (१) बीजके.

कप्प्यांचा बीजक ​विन्यास अक्षलग्न बीजके अनेक [⟶ फूल]. बोंडे (फळे) क्व​चित आढळतात बी सपाट असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲमारिलिडेसी कुलात (मुसली कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. एकेरी व दुहेरी ‌‌‌(पर्ल) पुष्पमुकुट ‌‌‌असलेले असे दोन प्रकार असून एकेरी प्रकार अ​धिक सुगंधी असतो. ‌‌‌फ्रान्समध्ये फुलांपासून सुगंधी अर्क काढतात साबण, सुगंधी तेले, अत्तरे इत्यादींसाठी हा अर्क वापरतात. फुले वां​तिकारक मूत्रल (लघवी साफ करणारी) ‌‌‌असून जावामधील ​चिनी लोक भाजीत फुले टाकतात. कंदाचे चूर्ण परम्यावर देतात. फुलांच्या वेण्या, हार, तुरे व गजरे यांना व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले देवादिकांना वाहतात.

जगताप, अहिल्या पां.

लागवड : ​निशिगंधाला दुमट, ​निचऱ्याची जमीन चांगली जमीन १५−२० सेंमी. खोल नांगरून अगर खणून, कुळवून व बारीक करून ५०−६० सेंमी. अंतराने सऱ्या पाडतात त्यांत हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत, अर्धा टन लाकडाची राख आणि ६७५ ​किग्रॅ. भुईमुगाची पेंड घालून चांगली ​मिसळतात. मे–जूनमध्ये चांगले मोठे कंद सरीत ‌‌‌५ सेंमी. खोल खड्डे करून ४०–५० सेंमी. अंतराने लावतात. कंद उगवण्यास वेळ लागतो. सुरुवातीला बेतानेच पाणी द्यावे लागते. जरूरीप्रमाणे कोळपणी व ​निंदणी करतात. जुलै–​डिसेंबरपर्यंत फुले ​मिळतात. कंद न काढता तेथेच ठेवले, तर दोन वर्षांपर्यंत फुले ​मिळतात परंतु काही ​ठिकाणी दरसाल कंद खणून दुसऱ्या ​ठिकाणी ‌‌‌लावतात. ​निवडक कंद पुढील लागणीक​रिता बेणे म्हणून ठेवतात. बागेतील वाफ्यांत कडेने ​किंवा कुंड्यांतही कंद लावतात.

चौधरी, रा. मो.