निवळी : (१) फुलोरा व फळे यांसह फांदी, (२) फूल, (३) फळे, (४) बी.

निवळी : (​हिं. ​निर्मळी क. ​चिल्ली ​गिड पंकच्छिद्र, अंबुप्रसादनम् इं. ​क्लिअ​रिंग नट ट्री लॅ. ​स्ट्रिक्‌नॉस पोटॅटोरम कुल-लोगॅ​निएसी). ९–१२ मी. ‌‌‌उंचीच्या व एक मी. घेर असलेल्या ह्या मध्यम आकाराच्या पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात सर्वत्र रुक्ष जंगलात व ब्रम्हदेशात आहे. साल काळी, जाड, भेवाळ व खवलेदार असून पाने साधी, लहान देठाची, दीर्घवृत्ताकृती (लंबगोल), गुळगुळीत व चकचकीत असतात. ‌‌‌फुले पाढंरी, सुगंधी व घंटाकृती असून ए​प्रिल-मेमध्ये पानांच्या बगलेत वल्लरीवर [→ पुष्पबंध] येतात. मृदुफळ गोलसर, लहान व काळे ​बिया एक ते दोन, ​पिवळ्या, गोल व केसाळ असतात. ‌‌‌इतर शारीरिक लक्षणे ⇨ॲगॅनिएसी कुलात (कुचला कुलात) ​दिल्याप्रमाणे असतात. फळे खाद्य. बी डोळ्यांच्या ​विकारात मध व कापूर यांत उगाळून लावतात.जुनाट अ​तिसारावर बी ताकात उगाळून पोटात देतात. बी ​विषारी नसून वां​तिकारक ‌‌‌असते. दुधाबरोबर ​बियांचे चूर्ण परमा व मूत्र ​विकारांवर देतात गढूळ पाणी ​निवळण्यास यांची पूड वापरतात. याचे लाकूडकठीण व टिकाऊ असून उघड्या ​ठिकाणी ​पिवळे होत जाते ते घरबांधणी, नांगर, बैलगाड्या, सर्पण इत्यादींक​रिता उपयोगात आहे.

जमदाडे, ज. वि.