नाभा : पंजाब राज्याच्या पतियाळा जिल्ह्यातील राजपुरा–भतिंडा लोहमार्गावरील ऐतिहासिक महत्त्वाचे तटबंदी ठिकाण आणि पूर्वीच्या नाभा संस्थानची राजधानी. लोकसंख्या ३४,७६१ (१९७१). १७५५मध्ये हमीरसिंगने हे शहर वसविले. शहराच्या मध्यभागी चिरेबंदी किल्ला असून शामबागेत राजांची संगमरवरी स्मारके आहेत. राजवाडा मात्र शहराच्या बाहेर आहे. येथे शाळा, महाविद्यालय, दवाखाना इ. सोयी आहेत. धान्ये, साखर, कापड यांचा व्यापार आणि कापूस व लोकर पिंजणे, हातमाग, भरतकाम हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.

 

चौधरी, वसंत