नानकसिंग : (४ जुलै १८९७ – २८ डिसेंबर १९७१). ख्यातनाम पंजाबी कादंबरीकार. त्यांचे मूळ नाव हंसराज परंतु शीख धर्माचा स्वीकार केल्यानंतर ‘नानकसिंग’ असे नाव ते लावू लागले. ते लहान असतानाच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे पूर्ववयात त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. लेखनाची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती. आरंभी ते कविता करीत पुढे कादंबरीलेखनाकडे वळले. हिंदीतील श्रेष्ठ कादंबरीकार प्रेमचंद ह्यांचा नानकसिंगांवर फार मोठा प्रभाव होता.

नानकसिंगांनी सु. ३६ कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांच्यातील विकासक्षम वाङ्‌मयीन कलावंत त्यांतून प्रकट होत गेलेला आहे. छिटा लहू (१९३२) ही त्यांची पहिली गाजलेली कादंबरी कादंबरीकार म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या अनेक चांगल्या गुणांचा प्रत्यय तिच्यातून येतो. दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा ह्या सामाजिक कादंबरीत त्यांनी ताकदीने उभ्या केल्या आहेत. त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोनही तीत दिसून येतो.अध खिडिआ फुल्लं(१९४०)ही त्यांची दर्जेदार कादंबरी.त्यांच्या इक म्यान बिच दो तलवारांयाकादंबरीस१९६१ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कार प्राप्त झाला.

 

सामाजिक अन्यायाच्या जाणिवेनेप्रेरितहोऊनविधवांचाप्रश्न, अस्पृश्यता, जरठकुमारीविवाहअशाअनेकमहत्त्वाच्याविषयांनात्यांनीआपल्याकादंबऱ्यांतूनवाचाफोडलीआहे शेतकरीवश्रमिकह्यांच्याबद्दलत्यांनीसहानुभूतीबाळगली.स्त्रियांच्यासमानहक्कांचापुरस्कारकेला.१९४७ साली,देशाच्याफाळणीनंतरघडूनआलेल्यारक्तपातानेव्यथितहोऊनत्यांनीकाहीकादंबऱ्यालिहिल्या.त्यांच्याबहुतेक कादंबऱ्याशोकात्मआहेत.स्वतःच्या जीवनातीलअनेककडवटअनुभवहीत्यांनीआपल्याकादंबऱ्यांतूनकलात्मकपणेव्यक्तकेलेआहेत.

 

नानकसिंग हे पंजाबीसाहित्यातीलपहिलेवास्तववादी कादंबरीकार होत. पंजाबीकादंबरीलात्यांनीनवेचैतन्यप्राप्तकरूनदिले. वाचकालाखिळूनठेवणारीओघवतीनिवेदनशैली, प्रसंगांची कौशल्यपूर्ण गुंफणआणिपरिणामकारकशेवटहीत्यांच्याकादंबरीलेखनाची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत.

 

नानकसिंग ह्यांनी कथालेखनही केले तथापि त्यांचा पिंड कादंबरीकाराचा असल्यामुळे त्यांच्या कथाही कादंबरीच्या अंगाने लिहिल्या गेल्या आहेत.

के. जगजीत सिंह (इं.) कर्णे, निशा (म.)