नफूद: अन् नफूद. सौदी अरेबियातील वाळवंट. लांबी २९० किमी., रुंदी २२५ किमी. असून, याच्या उत्तरेस सिरियाचे वाळवंट व दक्षिणेस जेबेल शॅम्मार हा पर्वत आहे. सु. ९२ मी. उंचीच्या वाळूच्या टेकड्यांसाठी हे प्रसिद्ध असून जाऊफ व हाइल येथील मरूद्यानांना जोडणारा काफिला मार्ग या वाळवंटातून जातो.

पहा : अरबस्तान सौदी अरेबिया.

कांबळे, य. रा.