नदीद्वीप : नदीपात्रात निर्माण झालेले बेट. नदीने वाहून आणलेला गाळ तिच्या पात्रातच साचून बेट निर्माण होते. त्याच्या अडथळ्यामुळे नदीप्रवाहाला फाटे फुटतात. ते पुढे एकत्र आले आणि ही क्रिया वारंवार घडत राहिली, म्हणजे त्या प्रवाहाला गुंफित प्रवाह आणि फाट्याफाट्यांमध्ये निर्माण झालेल्या बेटांस नदीद्वीपे म्हणतात. भारतातील ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात व त्रिभूज प्रदेशात अनेक नदीद्वीपे निर्माण झालेली आहेत. त्यांपैकी १,२६१ चौ. किमी. क्षेत्राचे माजुली बेट जगातील सर्वांत मोठे नदीद्वीप आहे. पात्रातील कठीण खडकांमुळेही नदीद्बीप निर्माण होतात.
दाते, संजीवनी