जामरूद : पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात पेशावरच्या पश्चिमेस १४ किमी.वर, खैबर खिंडीच्या मुखाजवळ जामरूद हे लष्करी ठाणे आहे. १८३६ मध्ये पेशावरचा शीख राज्यपाल हरिसिंग याने जामरूदचा किल्ला बांधला. दुसऱ्या अफगाण युद्धानंतर ब्रिटिशांनी खैबरच्या रक्षणार्थ येथे सैन्याचा कायम तळ ठेवला. वायव्य रेल्वेच्या फाट्याने जामरूद पेशावरला जोडल्याने सैन्याच्या हालचाली सुलभ झाल्या. 

ओक, द. ह.