जांबी नदी : दक्षिण मध्य सुमात्रामधील ही नदी बारिसान पर्वतात उगम पावून सु. ७२० किमी. वाहत जाऊन जांबी शहराच्या ईशान्येस ९६ किमी.वर असलेल्या बेरहाला सामुद्रधुनीस मिळते. ह्या सामुद्रधुनीपासून जांबी शहरापर्यंत ही नदी जलवाहतुकीस उपयोगी आहे. हिला हारी असेही म्हणतात.

लिमये, दि. ह.