जवाहरलाल नेहरू विद्यापीठ: नवी दिल्ली येथील एक निवासीव अध्यापनात्मक विद्यापीठ. त्याची स्थापना १४ नोव्हेंबर १९६९ रोजी झाली. विद्यापीठाच्या कक्षेत भारतातील बहुतेक उच्च शैक्षणिक संस्था अंतर्भूत करता येतात. विद्यापीठाची विशिष्टअशी कक्षा नाही. तथापि भारतातील कोणतीही उच्च शिक्षण देणारी संस्था विद्यापीठास सामावून घेता येते. या विद्यापीठाचे संविधानइतर विद्यापीठांपेक्षा थोडे वेगळे असून त्याचे पंतप्रधान कुलपतीव राष्ट्रपती अभ्यागत(व्हिझिटर) आहेत. मात्र सर्व प्रशासकीय कारभार सवेतन कुलगुरूव कुलसचिव पाहतात. विद्यापीठात मुख्यत्वे परकीय भाषा-अभ्यासावर भर दिला जातो. निरनिराळ्या विद्याशाखांऐवजी विद्यापीठात चार विद्यालये(स्कूल्स) आहेत. तीअशी : परदेशी भाषा विद्यालय, आंतरराष्ट्रीय अभ्यास विद्यालय, समाजशास्त्रे विद्यालयव जीवविज्ञाने विद्यालय. यांशिवाय विद्यापीठ नजीकच्या काळात पुढील विद्यालये सुरू करणारआहे : सैद्धांतिकव परिस्थितिविज्ञान विद्यालय, संगणकव तंत्रविज्ञान विद्यालय, सर्जनशीलकला विद्यालय. विद्यापीठातील ग्रंथालयात१,१८,१६९ ग्रंथ (१९७२) असून प्रत्येक विद्यालयाचे याशिवाय वेगळे ग्रंथालय आहे. १९७२ मध्ये विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्नव खर्च अनुक्रमे१११·८३ व ११४·११ लक्ष रु. होता. विद्यापीठानेपाच वर्षांचा समाकलित अभ्यासक्रम स्वीकारला असून पाच वर्षांनंतरएम्.ए. ही पदवी देण्यात येते. इतर सर्वसाधारण पदव्यांव्यतिरिक्त मास्टर ऑफ फिलॉसॉफी आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी यादोन पदव्युत्तर पदव्या प्रबंधाद्वारे देण्यात येतात.

उत्पन्नाच्याअटीवर सु. ७५ टक्के विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रु. शिष्यवृत्ती तसेच११५ विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रु. अधिछात्रवृत्ती मिळते. विद्यापीठाचे वसतिगृह प्रशस्त असून दिल्लीबाहेरचे बहुतेक विद्यार्थी त्यात राहतात.मानव्यविद्या, समाजशास्त्रे, विज्ञान वतंत्र या विषयांकरिता समाकलित अभ्यासक्रम ठेवण्याची योजना कार्यान्वित झालीअसून आंतरराष्ट्रीय अभ्यास विद्यालयात परराष्ट्रीय सेवा प्रशिक्षणदेण्याची व्यवस्था आहे. सूक्ष्मपट व सूक्ष्मपत्र यांचीही व्यवस्थाग्रंथालयात आहे. विद्यापीठात एकूण ५०० विद्यार्थी शिकत होते (१९७२).

देशपांडे, सु.र.