चौडैया :(१ जानेवारी १८९४ १९ जानेवारी १९६७). कर्नाटक संगीतपद्धतीतील एक नामवंत व्हायोलिन वादक. कर्नाटकातील तिरुमकूडल येथे जन्म. बिद्राम कृष्णाप्पा या विद्वानाकडे त्यांचे संगीतशिक्षण झाले.

 

चौडैयांनी आपले वादन सुरुवातीस चार तारांच्या व्हायोलिनवरच केले. नंतर त्यांनी सात तारांचे व्हायोलिन प्रचारात आणले. षट्‌कल गोविंद मारार यांनी तंबोऱ्यासाठी सात तारा वापरल्या होत्या. त्यावरून स्फूर्ती घेऊन चौडैयांनी रंगप्पा या स्थानिक तंत्रज्ञाच्या मदतीने सात तारांचे व्हायोलिन तयार केले. सात तारांच्या तंबोऱ्यात पंचम आणि जोडाच्या दोन तारा यांची संख्या दुप्पट केली होती. त्याचप्रकारे चौडैयांनी व्हायोलिनच्या पहिल्या तीन तारांची संख्या दुप्पट केली. जादा तारांना आपल्या शेजारच्या तारेच्या एक सप्तक खालच्या स्वरात जुळविण्यात येई. सात तारांची जुळवणी पुढीलप्रमाणे असे :

चौथी तार  

तिसरी 

दुसरी 

पहिली 

 .

प प

.. .

स स

 .

प प

 .

चौडैयांचे वादनकौशल्य, विशेषतः  गजकाम, वाखाणण्याजोगे होते. सरळ ताना काढणे व गजाच्या तुटक आघाताने (स्टकाटो) वाजविणे या दोन्हींत त्यांचा हातखंडा होता. गेल्या व चालू पिढीतील बहुतेक नामवंत कलावंतांबरोबर त्यांनी साथसंगत केली. म्हैसूर दरबारचे ‘समस्थान विद्वान’, म्हैसूरच्या महाराजांकडून ‘संगीतरत्‍न’ पदवी असे अनेक मानसन्मान त्यांना लाभले.

सांबमूर्ती, पी. (इं.) रानडे, अशोक (म.)