चोपडा जळगांव जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३२,६५६ (१९७१). हे सुरत—भुसावळ लोहमार्गावरील एरंडोल रोड रेल्वे स्थानकाच्या उत्तरेस सु. ३०·५ किमी. व धुळ्याच्या ईशान्येस ८२ किमी. असून गिरणा—तापी संगमापासून सु. १० किमी.वर आहे. ही शेतमालाची मुख्य बाजारपेठ असून मुख्यतः कपाशीचा व्यापार चालतो. तेलाच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या तसेच सरकी काढणे व  गठ्ठे बांधणे यांचे कारखाने असून, मुद्रणालये व हातमाग आहेत. येथे पडीक किल्ला असून रामेश्वर मंदिर व जामा मशीद प्रसिद्ध आहेत.

कांबळे, य. रा.