दूधसागर : गोव्यातील प्रसिद्ध धबधबा. हा मडगावच्या पूर्वेस सु. ४४ किमी. अंतरावर, मार्मागोवा–लोंढा लोहमार्गावरील दूधसागर स्थानकाच्या उत्तरेस १ किमी. अंतरावर, मांडवी नदीच्या दूधसागर उपनदीवर आहे. कुळे ते कॅसलरॉकच्या भागात गगनचुंबी वृक्षराजीतून घाटमार्ग वळणे घेत दूधसागर धबधब्याजवळून जातो. दूधसागर रेल्वे स्थानकावरूनही हा धबबधा दिसतो. दूधसागर स्थानकांनंतर गाडी बोगद्यातून जेव्हा बाहेर पडते, तेव्हा शुभ्र दूधसागर डावीकडून सु. १५२ मी उंचीवरून टप्प्याटप्प्यांनी उड्या घेताना दिसतो.
सावंत, प्र. रा.
“