चॉमॉल्हारी : आसाम-हिमालयातील एक शिखर. २७° ५०’ उ. ८९° १६’ पू. उंची ७,३१४ मी. भारतातून सिक्कीम-चुंबी खोऱ्यातून ल्हासाला जाणाऱ्या मार्गावरील टांगला खिंडीच्या पूर्वेस भूतान–तिबेट सरहद्दीवर हे आहे. जोमोलारी नावानेही ते ओळखले जाते. चॉमॉल्हारीचा अर्थ देवतेचा पर्वत असा असून तिबेटी लोक याला फार पवित्र मानतात. दरवर्षी १६ किमी. वरील फरी झाँग गावापासून मिरवणुकीने येथे प्रार्थनेसाठी लोक येतात. स्पेन्सर चॅपमन व शेर्पा पासांग दावा लामा या गिर्यारोहकांनी २१ मे १९३७ रोजी हे सर केले होते.

ओक, द. ह.