चरण : कर्नाटक संगीतातील एक संज्ञा. कृती, वर्णम्, पदम्, जावळी वा तत्सम कर्नाटक संगीतरचनांचे अनुक्रमे ⇨पल्लवी ⇨अनुपल्लवी व चरण असे एकूण तीन भाग असतात. सामान्यतः ⇨पदम् या रचनेच्या पल्लवी आणि अनुपल्लवी या भागांएवढी वा अनुपल्लवीएवढी किंवा अनुपल्लवीच्या चौपट चरणाची लांबी असू शकते. अनेक वेळा चरणाच्या उत्तर भागाचे संगीत व अनुपल्लवीचे संगीत सारखेच असते.
रानडे, अशोक