चंद्रकला : (आयुर्वेद). वाढलेला ज्वर कमी करणारे पित्तनाशक औषध. पारा, ताम्रभस्म व गंधक ही मुख्य द्रव्ये यात आहेत. हे खलताना याला डाळिंब, दुर्वा, केवडा इ. पित्तनाशक औषधींच्या रसाच्या भावना देतात. त्यात कुटकी, पित्तपापडा, वाळा इत्यादींचे चूर्ण घालून पुन्हा द्राक्षादि गणाच्या औषधांच्या भावना देतात. अंतर्बाह्य दाह, रक्तस्राव, रक्तवांती, रक्तप्रदर, लघवीला आग होणे, दाहकारक वाढलेला ज्वर, थकवा, मूर्च्छा इ. पित्तवातात्मक रोगांवर व उन्हाळ्यात हे औषध अत्यंत उपयुक्त आहे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री