तर्पणप्रयोग : डोळ्यात औषध शिंपडणे, त्याचे थेंब घालणे, औषधाचे अंजन करणे यांमुळे डोळ्यातून पाणी जाऊन व त्याबरोबर दोष जाऊन डोळा अशक्त होतो. तो पुन्हा बलवान व्हावा म्हणून डोळ्याचे तर्पण करतात. भुवईइतकी लांब उडदाच्या पीठाची पाळी नाकापासून खालून व डोळ्याभोवती घालून त्यात औषधिसिद्ध दूध, तुपाची निवळ घालून काही वेळ ठेवावे. स्वस्थाला पाचशे, कफाला सहाशे, पित्ताला आठशे व वाताला एक हजार अक्षरे मोजण्याइतका काल त्या औषधात डोळा बुडवून ठेवावा, शास्त्रोक्त विधीप्रमाणे सर्व करावे म्हणजे डोळ्याचे बल वाढते, तर्पण होते.

जोशी, वेणीमाधवशास्त्री