चौसष्टी पिंपळी चौसष्ट तास किंवा प्रहर खलून सूक्ष्म केलेली पिंपळी. औषध जितके खलावे तितके गुणवान होते. ही सूक्ष्म केलेली पिंपळी शरीरातले धातुघटक श्रेष्ठ प्रतीचे बनविते. जीर्ण ज्वर, क्षय, मलावरोध, प्रवाहिका (आमांश), श्वास, खोकला वगैरे रोगांवर ती उपयुक्त आहे. खलून सूक्ष्म केलेल्या औषधाचे प्रमाण अल्प पुरते, ते शरीरात चटकन पचते, आत्मसात होते व जुनाट रोग नष्ट करते. ते अतिशय गुणवान होते.

                             

जोशी, वेणीमाधवशास्त्री