घुमटी पट्टिताश्म : (डोम नाइस). ग्रॅनाइट किंवा ग्रॅनाइट पट्टिताश्म यासारख्या खडकांवर वायुक्रियेचा (वाऱ्याने होणाऱ्या झिजेचा) परिणाम होऊन त्यांचे काही भाग नाहीसे झाले, म्हणजे शिल्लक उरलेल्या भागांचे घुमटाच्या आकाराचे डोंगर तयार होतात. असे डोंगर बिहारात व बंगालच्या उत्तर भागात आढळतात. म्हणून तेथल्या पट्टिताश्मांस कधीकधी घुमटी पट्टिताश्म असे म्हणतात.

केळकर, क. वा.